पंतप्रधानांनी प्रसिद्ध केले श्रीराममंदिरावरील टपाल तिकीट !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे होणार्या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराममंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. यासह प्रभु श्रीरामाविषयी जगभरात प्रसिद्ध झालेल्या तिकिटांचे पुस्तकही त्यांनी १८ जानेवारी या दिवशी प्रकाशित केले. टपाल तिकिटाच्या आराखड्यात श्रीराममंदिर, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराभोवतीच्या मूर्तींचा समावेश आहे.
सौजन्य नरेंद्र मोदी
या वेळी पंतप्रधान म्हणाले, ‘टपाल तिकिटाचे कार्य आपल्या सर्वांना ठाऊक आहे; पण हे तिकिट आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावते. टपाल तिकीट हे इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंग पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे एक माध्यम आहे.’