जम्मू भागातील राजौरीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर भूसुरुंगाचा स्फोट !
१ सैनिक ठार, तर २ घायाळ !
राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथील नौशेरा भागातील भारत-पाक सीमेवर १८ जानेवारीच्या सकाळी साडेदहा वाजता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यात एक सैनिक मारला गेला, तर दोन जण घायाळ झाले. स्फोटानंतर सैनिकांना तातडीने विमानाने उधमपूरच्या कमांड रुग्णालयात नेण्यात आले. गेल्या वर्षीही राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला होता. त्यात सैनिकाचे दोन कामगार घायाळ झाले होते.