पिंपरी (पुणे) येथील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
पिंपरी – येथील ‘पिरॅमिड डेव्हलपर्स’चे बांधकाम व्यावसायिक खेमचंद भोजवानी आणि त्यांचे भागीदार, तसेच गृह प्रकल्पाच्या भूमीचे मालक यांच्या विरोधात फसवणूक अन् विश्वासघात केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दयानंद पाटील यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. शहरातील बांधकाम आणि इमारतींची संख्या वाढत असून फ्लॅटधारकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्रतिदिन प्रविष्ट होत आहेत.