कलबुर्गी (कर्नाटक) येथे महिलेला धमकावणार्या पोलीस हवालदाराच्या विरोधात गुन्हा नोंद !
कलबुर्गी (कर्नाटक) – शहरातील कमलापूर पोलीस ठाण्याचा हवालदार बसवराज याने तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेचा मानसिक छळ करून तिला धमकावल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका घटनेच्या संदर्भात पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यासाठी गेली होती. त्यावेळी बसवराज याने महिलेशी परिचय करून घेतला. त्याने तिचा भ्रमणभाष क्रमांक घेतला आणि प्रतिदिन फोन करून तिला त्रास देऊ लागला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला सहकार्य केलेस, तर तुझी तक्रार सोडवतो. तू माझे म्हणणे ऐकले नाहीस, तर घरी येऊन तुला उचलून घेऊन जाईन’, अशी धमकी बसवराज याने दिली. महिलेच्या तक्रारीनुसार महिला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकारक्षक नव्हे, तर भक्षक पोलीस ! |