Bihar Hindu Marrying MuslimGirl : वैशाली (बिहार) येथे मुसलमान युवतीशी विवाह करणार्या हिंदु तरुणाची हत्या !
वैशाली (बिहार) – संतोष कुमार या हिंदु तरुणाची हत्या करून त्यांचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला. त्याने मुसलमान तरुणीशी प्रेमविवाह केल्याने त्यांची हत्या करण्यात आली. संतोष कुमार हे वैशाली जिल्ह्यातील बहुआरा गावचे रहिवासी होते. ही हत्या मुसलमान युवतीच्या कुटुंबियांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (मुसलमान तरुण हिंदु मुलींना फसवून त्यांच्याशी विवाह करतात आणि नंतर त्यांचा ‘जिहाद’साठी वापर करतात. एवढे होऊनही हिंदु मुलींचे कुटुंबीय असाहाय्यपणे परिस्थिती स्वीकारून शांत रहातात; मात्र बहुतांश प्रकरणात एखाद्या हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी प्रेमविवाह केला, तर त्यांची हत्या ही निश्चित असते. यातून मुसलमानांची कट्टरता दिसून येते ! – संपादक)
१. पोखरा गावातील शौकत अली यांची २० वर्षीय मुलगी मोसरत खातून संतोष कुमारसोबत वैशालीहून देहलीला पळून गेली होती. तेथे त्यांनी ३ महिन्यांपूर्वी हिंदु रितीरिवाजानुसार लग्न केले होते.
२. मोसरत पळून गेल्यानंतर तिच्या वडिलांनी पाटेपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. संतोष कुमार आणि मोसरत १० दिवसांपूर्वीच देहलीहून गावात परतले होते.
३. मृत संतोष कुमार यांच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुसलमान युवतीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनी लव्ह जिहादला विरोध केल्यावर ‘प्रेमाला धर्म नसतो’, असा हिंदूंना फुकाचा सल्ला देणारे निधर्मीवादी अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ? |