Anti-SriRamMandir Incident Karnataka : पुत्तुरू (कर्नाटक) येथे अक्षता वितरण करणार्या हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण !
पुत्तुरू (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिर उद्घाटनानिमित्त घरोघरी अक्षता वितरणाचा कार्यक्रम उत्साहाने होत असतांना येथे अक्षता वितरण संचालकांवर आक्रमण झाल्याची घटना नुकतीच घडली.
हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि अक्षता वितरण संचालक संतोष हे मुंडुरू येथे घरोघरी अक्षता वितरण करत होते. त्या वेळी त्यांना अक्षता वितरणास विरोध करणार्या गटाने त्यांच्यावर आक्रमण केले. संतोष यांचा बचाव करण्यास आलेल्या त्यांच्या आईवरही आक्रमण करण्यात आले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
स्थानिक निवासी धनंजय आणि त्याच्या गटाने हे कृत्य केले आहे. पुत्तुरूचे माजी आमदार संजीव मठांदुरू यांनी या आक्रमणाचा निषेध केला असून ‘हे राजकीय आक्रमण असून पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना त्वरित अटक करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.
Devout Hindus distributing Akshata attacked in #Puttur (#Karnataka) !
Since the Shriram Mandir-hating Congress is in power in Karnataka, such incidents are unsurprising.
Hindus should now unite to finish the Congress politically !
Time we realised that only an efficient Hindu… pic.twitter.com/hvPc9b3Cdg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2024
संपादकीय भूमिका
|