Mouse In Veg-Food : मुंबईतील ‘बारबेक्यू नेशन’ उपाहारगृहातील शाकाहारी अन्नात उंदीर सापडल्याचा आरोप !
असा प्रकार घडला नसल्याचे ‘बारबेक्यू नेशन’चे स्पष्टीकरण
मुंबई – प्रयागराज येथील राजीव शुक्ला यांनी ८ जानेवारी या दिवशी मुंबईतील ‘बारबेक्यू नेशन’ या उपाहारगृहातून शाकाहारी अन्न मागवले होते; पण त्यात मेलेला उंदीर आढळला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे, तरीही अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. शुक्ला मुंबईतील वरळी परिसरात कामानिमित्त आले होते. त्यांच्या संदर्भात वरील प्रकार झाला.
सौजन्य : मिरर नाऊ
जेवणातील एका डाळीच्या डब्यात मेलेला उंदीर आढळून आला. तो उंदीर दिसेपर्यंत शुक्ला यांनी तो पदार्थ खाल्ला होता. यामुळे प्रकृती खालावून त्यांना ३ दिवस रुग्णालयात ठेवावे लागले होते.
‘बारबेक्यू नेशन’ने याविषयी सांगितले की, याविषयी आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार या प्रकरणाची गंभीर नोंद घेत आम्ही चौकशी केली आहे; पण आम्हाला अशी कोणतीही त्रुटी आढळून आली नाही.’’