Indian Students In Canada : भारतातून कॅनडात शिकण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या ८६ टक्क्यांनी घटली !
ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये शिकण्यासाठी जाणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये ८६ टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती कॅनडाचे स्थलांतर खात्याचे मंत्री मार्क मिलर यांनी एका मुलाखतीत दिली आहे.
86% reduction in the number of Indian students opting #Canada for higher education.#DiplomaticRow#IndiaCanadaRelations#IndianstudentsinCanadapic.twitter.com/DZUqjqGde5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2024
मार्क मिलर म्हणाले की, अभ्यासासाठी कॅनडात येणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता धुसर आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येशी भारतीय हस्तकांना उत्तरदायी ठरवत आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला. या सगळ्या परिस्थितीमुळेच अभ्यासासाठी येणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. ही परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागू शकतो.