भोगावती नदीत दूषित पाण्याने सहस्रो मासे मृत्यूमुखी !
कोल्हापूर – भोगावती नदी पात्रातील पाण्याची पातळी गेले ४ दिवस खालावली होती. २ दिवसांपासून नदीपात्रातील पाण्याचा रंग काळा होता आणि पाण्याला दुर्गंधी येत होती. यामुळे पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यातील सहस्रो मासे मृत्यूमुखी पडल्याने पाण्यावर तरंगत होते. भोगावतीचे पाणी वारंवार प्रदूषित झाल्याने नदीचे पाणी पिणार्यांना आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवू शकतात; मात्र प्रदूषण मंडळ याकडे नेहमीच डोळेझाक करते, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
संपादकीय भूमिका :केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ ! |