राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणे बंधनकारक करा ! – मनसेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर – पतीच्या अनुपस्थितीत मुसलमानी राजवटीविरुद्ध बाल शिवाजी आणि मावळे यांमध्ये ‘स्वराज्य स्थापना’चे बीज रोवून ‘हिंदवी स्वराज्याचे’ महान स्वप्न रूजवणारी माऊली म्हणजे राजमाता जिजाऊ होय. अशा महान व्यक्तीमत्त्वाची प्रतिमा शासकीय कार्यालयात नसणे, ही खेदाची गोष्ट आहे. तरी राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणे बंधनकारक करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले. या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असून मागणी मान्य न झाल्यास जनचळवळ उभारून तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक सुनील सामंत, विभाग अध्यक्ष सचिन साळोखे, चंद्रकांत कांडेकरी, महिला संघटक मनीषा घाटगे, युवा महिला संघटक दिशा मांडवकर, गौरी कुलकर्णी, महेश कदम, मनोज जाधव, विशाल कांबळे, शुभम खांडेकर यांसह अन्य उपस्थित होते.