पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या प्रयोगाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे !
‘आज पौष शुक्ल सप्तमी (१७.१.२०२४) या दिवशी देहली येथील सनातनचे संत पू. संजीव कुमार यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. संजीव कुमार आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) माला कुमार यांची पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. या सत्संगाच्या वेळी उभयतांना समोर बोलावून ‘त्यांच्याकडे पाहून काय जाणवते ?’, असा सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला होता. या प्रयोगाच्या वेळी ६५ टक्के आधात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत
पू. संजीव कुमार यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पू. संजीव कुमार यांच्याकडे पाहून जाणवलेली सूत्रे !
१ अ. त्यांचा अहं अत्यल्प असल्याचे जाणवले.
१ आ. त्यांच्या मुखावर चैतन्यामुळे पिवळसर रंगाची छटा आल्याचे सूक्ष्मातून जाणवले आणि त्यांच्या डोक्याभोवती निर्गुण चैतन्यामुळे पांढर्या रंगाची प्रभावळ फिरतांना दिसली.
१ इ. त्यांच्या हृदयात परात्पर गुरुदेव, सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्याप्रती दास्यभाव, सेवाभाव अन् कृतज्ञताभाव असल्याचे जाणवले.
१ ई. पू. संजीव कुमार यांना श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेमुळे धर्मसंस्थापनेच्या कार्यात धन अर्पण करून खारीचा वाटा उचलण्यासाठी प्रेरणा मिळणे : ते लक्ष्मीपुत्र असून श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपेमुळे त्यांना श्रीविष्णूच्या अवतारी कार्यामध्ये, धर्मसंस्थापनेच्या कार्यात धन अर्पण करून खारीचा वाटा उचलण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, असे जाणवले.
१ उ. त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींमुळे वातावरणही चैतन्यदायी अन् आनंदमय झाल्याचे जाणवले.
१ ऊ. त्यांच्या अनाहतचक्रातून भाव, आज्ञाचक्रातून चैतन्य आणि सहस्रारचक्रातून शांती यांची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती.
१ ए. त्यांच्यामध्ये धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार करण्याची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये इतरांना धर्माचरण आणि साधना करण्याचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशा देण्याची क्षमता असल्याचे जाणवले. त्यामुळे या प्रयोगानंतर त्यांना प्रसारात दौर्यावर जाऊन समाजातील साधक, हिंदुत्वनिष्ठ, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांना साधनेच्या संदर्भात समष्टी स्तरावर मार्गदर्शन करण्यास सांगितले.
२. पू. सौ. माला कुमार यांच्याकडे पाहून जाणवलेली सूत्रे !
२ अ. त्यांच्यामध्ये साधकांप्रती असणार्या प्रीतीमुळे त्यांचा चेहरा गुलाबी रंगाचा झाल्याचे जाणवले.
२ आ. त्यांच्या हृदयातील आनंद त्यांच्या चेहर्यावरून व्यक्त होत होता. त्यामुळे त्यांचा चेहरा आनंददायी होता आणि त्या सतत स्मितहास्य करून इतरांनाही हा आनंद देत होत्या.
२ इ. त्यांची देहबुद्धी अल्प असल्यामुळे त्यांच्या मनात स्वतःविषयी विचार न येता त्या स्वतःकडेही साक्षीभावाने पहात असल्याचे जाणवले.
२ ई. त्यांचा शब्दातीत नामजप, म्हणजे पश्यंती वाणीतील नामजप चालू असल्याचे जाणवले. हा नामजप शब्दातीत असल्यामुळे त्यांना नामजपामुळे केवळ आनंदाची अनुभूती येत होती. त्यामुळे त्या आनंदावस्थेतील अनुभूतीच्या माध्यमातून सतत ईश्वराच्या अनुसंधानात असल्याचे जाणवले.
२ उ. त्यांच्यातील समष्टी भाव आणि प्रीती या गुणांमुळे त्यांच्यामध्ये ‘इतरांना धर्माचरण आणि साधना सांगणे आणि त्यांनाही आनंद अनुभवायला देणे’, याची तीव्र तळमळ आहे. त्यामुळे या प्रयोगानंतर त्यांना प्रसारात दौर्यावर जाऊन समष्टी स्तरावर मार्गदर्शन करण्यास सांगितले.
३. श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
३ अ. श्री. संजीव कुमार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलत असतांना जाणवलेली सूत्रे
३ अ १. निरागसभाव जाणवणे : त्यांच्या मनामध्ये निरागसभाव असल्यामुळे जेव्हा ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहात होते, तेव्हा त्यांच्या मनामध्ये साधनेविषयी जिज्ञासेपोटी विविध प्रश्न निर्माण होत होते. त्यांच्या मनातील प्रश्न जेव्हा ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारत होते, तेव्हा त्यांच्यामध्ये पुष्कळ निरागसभाव जाणवत होता.
३ अ २. बालकभाव जाणवणे : त्यांच्यामध्ये बालकभाव असल्याचे जाणवले. त्यामुळे ते स्वतःच्या मनातील प्रश्न, शंका किंवा विचार प्रांजळपणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारत होते. त्यांचे प्रश्न, शंका किंवा विचार ऐकल्यानंतर माझ्या हृदयातही भगवंताप्रती बालकभाव जागृत होत असल्याचे जाणवले.
३ आ. सौ. माला कुमार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलत असतांना जाणवलेली सूत्रे
३ आ १. आनंदात वृद्धी होऊन दिव्यानंद अनुभवणे : त्या शिवदशेत राहून दिव्यानंद अनुभवत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलत असल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगामुळे त्यांच्या आनंदावस्थेत पुष्कळ प्रमाणात वृद्धी झाल्याचे जाणवले.
३ आ २. सौ. माला कुमार या स्थुलातून पृथ्वीवर असल्या, तरी सूक्ष्मातून त्या शिवदशा अनुभवत असल्यामुळे त्यांचे सूक्ष्म रूप वैकुंठात असणे आणि नंतर त्या श्रीहरि विष्णूच्या विशाल चरणांमध्ये सामावल्याचे जाणवणे : त्या स्थुलातून पृथ्वीवर असल्या, तरी सूक्ष्मातून त्या शिवदशा अनुभवत असल्यामुळे त्यांचे सूक्ष्म रूप वैकुंठात होते. तेथे त्यांना श्रीहरि विष्णूच्या निळसर रंगाच्या विशाल चरणांचे दर्शन होऊन त्या श्रीहरि विष्णूच्या चरणांशी एकरूप होण्यासाठी आतुर झाल्याचे जाणवले. थोड्या वेळाने मला असे दिसले की, त्यांच्या सूक्ष्म रूपाचे रूपांतर धुरात आणि त्यानंतर पांढर्या रंगाच्या लहरींमध्ये होऊन या लहरी श्रीहरि विष्णूच्या विशाल चरणांमध्ये सामावल्याचे जाणवले. तेव्हा त्यांचे अस्तित्व सूक्ष्मतर असून त्यांना आनंद आणि शांती यांची एकाच वेळी अनुभूती आली.
४. श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यापूर्वी आणि केल्यानंतर जाणवलेली सूत्रे
२३.१२.२०२१ या दिवशी एका सत्संगात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या अनमोल मार्गदर्शनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या साधकांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी श्री. संजीव कुमार आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. माला कुमार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. तेव्हा १५.१२.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीत, म्हणजे संतपद घोषित होण्यापूर्वी आणि २३.१२.२०२१ या दिवशी संत घोषित केल्यावर दुसर्या दिवशी दैनिकात प्रसिद्ध झालेले त्यांचे छायाचित्र पाहून जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
४ अ. श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार यांचे संतपद घोषित होण्यापूर्वी त्यांना प्रत्यक्ष पाहून आणि त्यांचे संतपद घोषित केल्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे छायाचित्र पाहून जाणवलेली सूत्रे
४ आ. पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांनी संतपद प्राप्त करण्यापूर्वी अन् केल्यानंतर त्यांची विविध योगमार्गानुसार साधना होण्याचे प्रमाण
४ इ. पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांनी संतपद प्राप्त करण्यापूर्वी अन् केल्यानंतर केलेल्या विविध प्रकारच्या त्यागाचे प्रमाण
५. पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्यातील गुणांचे स्वरूप, साधनेचा मार्ग आणि त्यांच्या त्यागाचे स्वरूप यांच्यात पुष्कळ साम्य असल्यामुळे त्यांनी एकत्र आध्यात्मिक उन्नती केलेली असणे : पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्यातील गुणांचे स्वरूप, साधनेचा मार्ग आणि त्यांच्या त्यागाचे स्वरूप यांच्यात पुष्कळ साम्य आहे. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नतीही एकसारखी चालू आहे. वर्ष २०१७ मध्ये या दांपत्याने एकाच दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले. त्याचप्रमाणे २३.१२.२०२१ या दिवशी त्यांनी एकाच दिवशी संतपदही प्राप्त केले आहे. त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगतीही अशीच एकत्र चालू राहिल्यामुळे ते काही वर्षांनी एकाच दिवशी सद्गुरुपदावरही विराजमान होणार आहेत.’
६. अनुभूती : पू. संजीव कुमार आणि पू. सौ. माला कुमार यांच्या संदर्भातील वरील गुणवैशिष्ट्ये मला वर्ष २०२१ मध्ये जाणवली होती; परंतु अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे मला त्यांचे लिखाण करता आले नव्हते. देवाच्या कृपेने आज त्यांचे लिखाण करता आले, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञ आहे.
‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळे पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संदर्भात वरील सूक्ष्म स्तरावरील सूत्रे जाणवली अन् त्यातून शिकायला मिळाले’, यासाठी मी तुझ्या श्री चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२४)
|