बलात्कार पीडितेवर बलात्कार करणारा अधिवक्ता पसार !
कोच्ची – एका बलात्कार पीडितेवर बलात्कार करणारा उच्च न्यायालयाचा वरिष्ठ अधिवक्ता पी.जी. मनू याच्या विरोधात ‘लुकआउट नोटीस’ (आरोपी देश सोडून पळू जाऊन; म्हणून काढलेली नोटीस) जारी केली आहे. बलात्कार पीडितेवरच बलात्कार केल्याच्या आरोपानंतर तो पसार आहे. उच्च न्यायालयाने मनू याला आत्मसमर्पण करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली होती.
१. ऑक्टोबर २०२३ मध्ये २५ वर्षीय बलात्कारपीडित तरुणी बलात्काराच्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मनू याच्याकडे गेली होती. यानंतर मनूने तरुणीवर ३ वेळा बलात्कार केला आणि अश्लील छायाचित्रेही काढली.
२. तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, ‘९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ती तिच्या आई-वडिलांसोबत कडवंथरा कार्यालयात गेली असतांना मनू याने पीडितेच्या पालकांना बाहेर थांबण्यास सांगितले आणि पीडितेशी चर्चा करण्याच्या बहाण्याने दरवाजा बंद केला आणि खोलीत तिच्यावर बलात्कार केला.
३. पीडितेच्या तक्रारीनुसार जेव्हा तिने अदिवक्त्याच्या या कृतीला विरोध केला, तेव्हा त्याने तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात तिलाच आरोपी बनवण्याची धमकी दिली. मनू याने तिला ११ ऑक्टोबरला पुन्हा बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.
४. ‘मनू हा व्हॉट्सअॅप कॉल आणि चॅट यांच्या माध्यमातून अश्लील बोलत असे’, असे महिलेने सांगितले. २४ नोव्हेंबर या दिवशी पीडितेच्या घरी कुणी नसतांना मनू याने बळजोरीने तिच्या घरात घुसून तिच्यावर तिसर्यांचा बलात्कार केला.
संपादकीय भूमिका
|