UP Love Jihad : उत्तरप्रदेशात मुसलमानाकडून विवाहित हिंदु महिलेचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर !
हमीरपूर (उत्तरप्रदेश) – बिनवार येथे रहाणार्या अनिस खान या मुसलमान तरुणाने एका विवाहित हिंदु महिलेचे अपहरण केले. यानंतर त्याने महिलेचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले. पीडित महिलेला २ वर्षांचा मुलगा आहे. पीडित महिलेचे पती मनीष गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिस खान याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मनीष गुप्ता यांनी सांगितले, ‘माझ्या पत्नीने इस्लामी रितीरिवाजांनुसार लग्न केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात माझ्या पत्नीचे मौलाना मुश्ताक धर्मांतर करत असून तिचे अनिस खान याच्याशी लग्न लावून देत असतांना दिसत आहे.’ ‘या प्रकरणी अन्वेषण चालू असून पोलीस लवकरच आरोपींना अटक करणार आहेत’, असे बिनवार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गौरव चौबे यांनी सांगितले.