पुणे येथे क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग !
पुणे – अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांतून अश्लील चित्रफीत पाठवून शुभम नाईक या क्रीडा शिक्षकाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी १३ जानेवारी या दिवशी अल्पवयीन मुलीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार १२ मे ते १६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला. तक्रार नोंद केल्यानंतर सदर शिक्षकास अटक करण्यात आली असून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ? |