सांगली येथे ‘मंगल कलश शोभायात्रा’ आणि ‘श्री तुलसीदास रामायण कथा वाचन’ यांचे आयोजन !
सांगली, १५ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण महोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री बालाजी मंदिर संचालित श्री सीताराम मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘भव्य मंगल कलश शोभायात्रा’ आणि ४ दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ जानेवारी या दिवशी सकाळी ९.१५ वाजता श्री बालाजी मंदिर येथून ‘श्री मंगल कलश तथा भव्य शोभायात्रा’ निघेल. कापडपेठ येथून परत शोभायात्रा बालाजी मंदिर येथे आल्यानंतर महाआरती करून सांगता करण्यात येईल. श्री सीताराम मंदिरात १९ ते २२ जानेवारी या दिवशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदूर येथील पू. विवेकानंद दधीच स्वामी हे श्री तुलसीदास रामायण कथा वाचन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.