उद्धव ठाकरे गटाची पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात याचिका !
आमदार अपात्रता प्रकरण
मुंबई – ‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्या’चा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निकालच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून न्याय मिळाला असल्याचे वाटत नसल्यास याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात’, असे सर्वाेच्च न्यायालयानेच हे दायित्व विधानसभा अध्यक्षांकडे सोपवतांना सांगितले होते.
या निकालात दोन्ही गटांतील आमदारांना पात्र ठरवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचे ठाकरे गटाने ऑनलाईन केलेल्या याचिकेत म्हटले आहे.