सांगली येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे उत्साहात स्वागत !
सांगली, १५ जानेवारी (वार्ता.) – ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने १४ जानेवारी या दिवशी सांगली येथे आलेल्या संकल्प यात्रेचे स्वागत स्टेशन चौक येथे सकाळी १० वाजता उत्साही वातावरणात करण्यात आले. यानिमित्ताने स्टेशन चौक येथे आयोजित विविध शासकीय योजनांच्या प्रदर्शनाला शेकडो नागरिकांनी भेटी देऊन त्याचा लाभ घेतला. महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी १९ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा चालू रहाणार आहे. या वेळी महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, माजी नगरसेविका सुनंदा राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत, ‘संजय गांधी निराधार समिती’च्या सदस्य सुरेखा मोरे, भाजपचे पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, तसेच महापालिकेचे ‘ब्रँडअँबेसेडर’ दीपक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुपारी भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनीही या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. त्यांच्या आयुष्यमान कार्ड पात्र लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले.