जगभरात साजरी केली जाणारी मकरसंक्रांत !

१५ जानेवारीला मकरसंक्रांत झाली. त्या निमित्ताने…

‘मकरसंक्रांतीचा सण हिंदूंच्या मुख्य सणांपैकी एक आहे. हा सण भारतात अनेक प्रांतांत विविध नावाने आणि निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो; परंतु याचे मूळ स्वरूप एकच असते. हा सण सूर्याेपासना, पीक आणि शेतकरी यांच्यासाठीही मानला जातो. हा सण तमिळनाडूमध्ये ‘पोंगल’, गुजरातमध्ये ‘उत्तरायण’, पंजाब अन् हरियाणा येथे ‘माघी’, आसाममध्ये ‘बीहू’, उत्तरप्रदेशमध्ये ‘खिचडी’ आणि उर्वरित भारतात ‘मकरसंक्रांती किंवा मकरसंक्रांत’ या नावाने साजरा केला जातो. या सणाला नेपाळ, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका इत्यादी ठिकाणीही याच श्रद्धेने साजरा केला जातो. मकरसंक्रांत हा सण प्रतिवर्षी विक्रम संवत्नुसार पौष मासामध्ये आणि शक संवत्नुसार माघ मासामध्ये शुक्ल पक्षात साजरा केला जातो.

या दिवशी सूर्याेदयापासून सूर्यास्तापर्यंतचे वातावरण अधिक चैतन्यमय असते. फलप्राप्तीसाठी साधना करणार्‍यांना या चैतन्यमय वातावरणाचा लाभ होतो.

(साभार : विविध संकेतस्थळे)