Tej Pratap Yadav : (म्हणे) ‘श्रीराम माझ्या स्वप्नात आले आणि सांगितले की, ते येत्या २२ जानेवारीला अयोध्येला येणार नाहीत !’ – बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव
बिहारचे पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव यांचे हास्यास्पद विधान !
पाटलीपुत्र (बिहार) – श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला सांगितले की, ते येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अयोध्येला येणार नाहीत. श्रीराम मला म्हणाले, ‘सध्या अयोध्येत जे काही चालले आहे ते ढोंग आहे. त्यामुळे मी त्या दिवशी तिकडे येणार नाही’, असे विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळातील पर्यावरणमंत्री तेज प्रताप यादव यांनी केले आहे. ‘निवडणुका आल्या की, मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कुणी विचारत नाही. कुणीही त्याविषयी बोलत नाही’, असेही ते म्हणाले.
Ram ji has come in my and 4 Shankracharyas dream that he will not come on 22nd January- Tejpratap Yadav pic.twitter.com/N36HRqaAB3
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) January 14, 2024
संपादकीय भूमिकाअशा प्रकारची विधाने सवंग लोकप्रियेतेसाठी आणि विरोधासाठी केली जात आहेत. उद्या दुसरा कुणीतरी म्हणेल की, ‘तेज प्रताप जे बोलत आहेत, ते खोटे आहे’, असा मला स्वप्नदृष्टांत झाला’ यावर तेज प्रताप काय बोलणार आहेत ? |