Stray dog Attack : भिलवाडा (राजस्थान) येथे कुत्र्याच्या आक्रमणात ६ मासांच्या मुलीचा मृत्यू
भिलवाडा (राजस्थान) – येथील हजियास गावात एका ६ मासांच्या मुलीवर कुत्र्याने केलेल्या आक्रमणात ती घायाळ झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला.
मुलगी पाळण्यात झोपल्यानंतर तिची आई म्हशीला चारा टाकत होती. तेवढ्यात अचानक एका कुत्र्याने येऊन मुलीवर आक्रमण केले. कुत्र्याने मुलीचा जबडा चावला. आईने कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आले आणि त्यांनी कुत्र्याचा पाठलाग केला. मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले. जिथे शस्त्रकर्मानंतर घंट्याभरात मुलीचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाभटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता युद्धपातळीवर उपाय काढणे महत्त्वाचे झाले आहे. याकडे आता केंद्र आणि राज्य सरकारे यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे ! यासाठी जनतेने सरकारांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे ! |