HJS Meet : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट !
समितीच्या कार्यात साहाय्य करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन !
उज्जैन (मध्यप्रदेश) – मकरसंक्रांतीच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १५ जानेवारी या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी येथील सर्किट हाऊसमध्ये सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजपचे नगर अध्यक्ष श्री. विवेक जोशी आणि अन्य पदाधिकरी उपस्थित होते. समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी मुख्यमंत्री डॉ. यादव यांना भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचे मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्यावरून अभिनंदन केले. या वेळी समितीकडून देशभरात धर्मशिक्षणाविषयी केल्या जात असलेल्या जनजागृती कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. या वेळी त्यांना समिती समर्थित ग्रंथ ‘धर्मशिक्षण फलक’ भेट देण्यात आला.
आज मकरसंक्रांति पर @HinduJagrutiOrg
की ओर से उज्जैन में मुख्यमंत्री मोहन यादवजी का श्रीकृष्ण की प्रतिमा देकर अभिनंदन किया । उन्हे समिति के कार्य से अवगत कराया एवं धर्मशिक्षा फलक ग्रंथ भेंट किया । इस समय भाजपा नगर अध्यक्ष विवेक जोशी उपस्थित थे । @Vivekjoshi_bjp2@DrMohanYadav51 pic.twitter.com/0UTvN7Ai0b— Anand Jakhotia® (@Anand_J25) January 15, 2024
या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत सरकारकडून साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी शिष्टमंडळामध्ये सर्वश्री शिवम सोनी आणि हेमंत जुवेकर, तसेच सौ. स्मिता कुलकर्णी उपस्थित होत्या.