Mouni Baba : दतिया (मध्यप्रदेश) येथे गेल्या ४० वर्षांपासून श्रीराममंदिरासाठी मौन बाळगणारे मौनीबाबा !
दतिया (मध्यप्रदेश) – अयोध्येत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत बोलणार नाही, अशी वर्ष १९८४ ला शपथ घेणारे येथील मौनीबाबा त्यांचे मौन व्रत २२ जानेवारी या दिवशी सोडणार आहेत. त्यांनी पायात चप्पल न घालण्याचीही शपथ घेतली होती. मौनीबाबा गेल्या ४४ वर्षांपासून फळे खाऊन जगत आहेत. मौनी बाबा यांचे नाव रामभाक्र मोहन असे आहे. दामोदरदास मौनी यांचे ते शिष्य असून दतिया जिल्ह्यातील उनाव बालाजी येथील रहाणारे आहेत. सध्या ते दतिया येथील पितांबरा पीठ मंदिरासमोरील अनामय आश्रमाजवळ रहातात.
रामभाक्र मोहन यांचे शिष्य गोलोक वासी म्हणाले की, मौनीबाबांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला न बोलवल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. पंतप्रधानांनी मौनीबाबा यांचे व्रत समाप्तीसाठी त्यांना मंदिराच्या उद्घाटनाला बोलवावे.