मंत्री अदिती तटकरे यांनी समजून घेतल्या लोकलगाडीतील प्रवाशांच्या अडचणी !
बदलापूर (जिल्हा ठाणे) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लोकलगाडीने प्रवास करत बदलापूर येथील प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या. ‘त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू’, असे तटकरे यांनी या वेळी सांगितले. येथे राष्ट्रवादी युवती आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी त्या उपस्थित होत्या.
‘शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांना माझ्याकडून किंवा माझ्या विभागाकडून, तसेच मी मंत्री असतांना जे काही सहकार्य लागेल, ते करेन’, असे त्यांनी या वेळी सांगितले.