पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना धारातीर्थ यात्रेचे निमंत्रण !
मुंबई – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांना २४ ते २८ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या गडकोट मोहिमेच्या समारोपप्रसंगी उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘समारोपप्रसंगी उपस्थित राहू’, असे आश्वासन दिले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २४ ते २८ जानेवारी या कालावधीत ‘दुर्ग श्रीरायरेश्वर ते श्रीप्रतापगड’ (मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर) अशी होत आहे.