हिंदु स्त्रियांनो, मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत होणार्या हळदी-कुंकू समारंभात सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून द्या !
‘१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत आणि ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सर्वत्र मोठ्या प्रमाणात हळदी-कुंकू समारंभ आयोजित केले जातात. त्यामध्ये सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वोत्तम आहेत.
१. वाचकांना अमूल्य ज्ञान देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ !
सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी नानाविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ वाण म्हणून दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत ते अमूल्य ज्ञान पोचेल.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या लघुग्रंथांवर पुढील आकर्षक सवलत उपलब्ध आहे.
२. सनातन संस्थेची विविध सात्त्विक उत्पादनेही (साबण, तसेच उदबत्ती, अत्तर, कापूर, अष्टगंध आदी पूजोपयोगी वस्तू) वाण म्हणून देता येतील.
वाण म्हणून देण्यासाठी ग्रंथ, लघुग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांची मागणी स्थानिक साधक किंवा नियतकालिकांचे वितरक यांच्याकडे करावी. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ९३२२३१५३१७ या क्रमांकावर संपर्क करावा किंवा sanatanshop.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.