‘हात कापून टाकू’ असे धमकावणार्‍या मुसलमान संघटनेच्या नेत्याच्या विरोधात गुन्हा नोंद !

सत्ताधारी युतीतील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या विरोधात दिली धमकी !

प्रतिकात्मक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येथील एका मुसलमान युवा संघटनेच्या नेत्याने त्याच्या राजकीय पक्षाच्या विचारवंतांच्या विरोधात कुणी बोलल्यास ‘हात कापून टाकू’, अशी धमकी दिली होती. यावरून केरळ पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सथार पंथालूर असे या युवकाचे नाव असून तो ‘समस्त केरळ जेम-इयाथुल उलेमा’ या राजकीय पक्षाची विद्यार्थी शाखा ‘केरळ सुन्नी स्टुडेंट्स फेडरेशन’चा नेता आहे. ही सुन्नी मुसलमानांची संघटना असून केरळमधील सुन्नी मुसलमानांचे सर्वाधिक समर्थन या संघटनेला आहे. ‘समस्त केरळ जेम-इयाथुल उलेमा’ या संघटनेचे काही विचारवंत सत्ताधारी युतीतील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या काही नेत्यांवर नाराज आहेत.

संपादकीय भूमिका

  • केरळ राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !