Save Taiwan From China : तैवानला चीनपासून वाचवण्यासाठी काम करणार !
तैवानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती लाई चिंग-ते यांचे प्रतिपादन !
तायपे (तैवान) – तैवानमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये लाई चिंग-ते हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, आम्ही देशाला चीनपासून वाचवण्यासाठी काम करणार आहोत. आम्हाला आशा आहे की, चीन भविष्यात आमच्या नवीन स्थितीला समजेल. चीनला समजले पाहिजे की, आम्हाला धमक्या देऊन त्याला काही मिळणार नाही, तर शांततेद्वारे चर्चा केल्यानेच लाभ मिळेल.
Statement of Taiwan's newly instated president Lai Ching-te !
Will work to save #Taiwan from #China !#TaiwanElections #Elections2024 #台灣大選pic.twitter.com/x0CVzee8PZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2024
१. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनच्या ‘एअर बलून’ला (गॅसचा मोठा फुगा) आमच्या सीमेमधून जातांना पहाण्यात आले. आम्ही याचा निषेध करतो. ही घटना आमच्या विमान वाहतुकीसाठी धोक्याची आहे. यानंतर आमच्या हवाईक्षेत्रात चीनची ८ लढाऊ विमाने आणि समुद्रात ६ युद्धनौका पहाण्यात आल्या.
२. अमेरिकेने लाई चिंग-ते यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही तैवानसमवेत काम करू आणि त्याला साहाय्य करू.
तैवानमध्ये होणार्या पालटामुळे आमच्या धोणात पालट होणार नाही ! – चीनची दर्पोक्ती
दुसरीकडे चीनने तैवानच्या निवडणुकीवरून म्हटले की, तैवानमध्ये होणार्या कोणत्याही पालटामुळे आमच्या धोरणात पालट होणार नाही. यामुळे ‘तैवान चीनचा भाग आहे’, हे सत्य पालटू शकत नाही. आम्हाला वाटते की, आंतरराष्ट्रीय समुदाय चीनच्या या गोष्टीला समजेल आणि त्याकडे गांभीर्याने पाहील.