पहूर (जळगाव) येथील युवतीच्या अपहरणप्रकरणी सिल्लोड येथील धर्मांध अधिवक्त्यास अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

पहूर – जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर परिसरातील युवतीला विवाहाचे आमीष दाखवून पळवून घेऊन जाण्याच्या कटात सिल्लोड येथील अधिवक्त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिवक्ता अहमद अनिस रफिक अहमद, असे अटकेतील धर्मांध अधिवक्त्याचे नाव आहे. या अपहरण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता ३ झाली आहे. (धर्मांध कितीही शिकले, तरी मूळ गुन्हेगारी वृत्तीत काही पालट होत नाही, हेच खरे ! – संपादक)

१ मासापूर्वी पहूर परिसरातील युवतीचे अपहरण झाले होते. या युवतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि पहूर पोलीस पथक यांनी राजकोट येथून ४ जानेवारी या दिवशी कह्यात घेतले होते. त्या वेळी शेख दाऊद शेख कालू (वय ३२ वर्षे, रा. लेलेनगर, पहूर) याला अटक करण्यात आली होती. अधिवक्ता अहमद अनिस हाही संबंधित गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे, अशी माहिती अन्वेषण अधिकारी एस्.पी. बनसोड यांनी दिली. अधिवक्ता अहमद अनिस हा सिल्लोड येथे वकिली करतो. सिल्लोड येथे १२ जानेवारी या दिवशी पोलिसांनी अधिवक्ता अहमद अनिस याला चौकशीसाठी बोलावून घेतले. खातरजमा झाल्यावर पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन पहूर येथे आणले.