गुहा (अहिल्यानगर) येथे कानिफनाथ महाराजांचेच मंदिर !
ऐतिहासिक दाखले देत ग्रामस्थांनी मांडली भूमिका !
नगर – राहुरी तालुक्यातील गुहामधील श्री कानिफनाथ देवस्थान ही वक्फ मंडळाची मालमत्ता असल्याचा दावा साम्यवादी पक्षाच्या साहाय्याने मुसलमानांनी केला होता. येथील श्री कानिफनाथ महाराजांची मूर्ती हटवण्यासाठी मुसलमान समाजातील काहींनी उपोषण चालू केले आहे. असे असतांना ‘हे देवस्थान हिंदूंचेच आहे’, अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थ आणि वडार समाज संघटना यांनी घेतली आहे. या देवस्थानाची जागा वक्फ बोर्डद्वारे बळकावण्याचा प्रयत्न धर्मांध करत आहेत. ११ जानेवारी या दिवशी येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची भूमिका मांडली आहे. या वेळी गुहा हे कानिफनाथ महाराजांचेच मंदिर असल्याचा दावा करत गावकर्यांनी अनेक ऐतिहासिक दाखले दिले आहेत.
ग्रामस्थांनी माध्यामांशी बोलतांना मांडलेली सूत्रे !
१. कानिफनाथ महाराजांनी मंदिरातून स्वत:च्या अलौकिक शक्तीने गुप्त भ्रमण करण्यासाठी भुयारी मार्गही सिद्ध केला होता. तो अजूनही आहे. त्याचे अवशेषही आहेत; म्हणून या भुयारी मार्गामुळे ‘मौजे गुहा’ गावास ‘गुहा’ हे नाव पडले.
२. वंचित बहुजन आघाडीची नेहमी हिंदु धर्माच्या विरोधातच का भूमिका असते ? वंचित बहुजन आघाडीने आमच्या गुहा गावाच्या प्रकरणात नाक खुपसू नये. (वंचित बहुजन आघाडीने मुसलमानांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.)
३. कानिफनाथ मंदिराच्या नावे असलेली ४० एकर भूमी कुणालाही कल्पना न देता परस्पर वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि कागदोपत्री कानिफनाथ मंदिर नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असा उल्लेख करण्यात आल्याने न्यायालयीन लढा चालू झाला. मंदिराची ३९ एकर जागा ‘वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा मुसलमानांचा कुटील डाव चालू आहे.
४. मंदिरामध्ये पुरातन त्रिशूल, मोराचे चिन्ह आहे, कोरीव काम केलेली देवी-देवतांची चित्रे आहेत. आतमध्ये एक गुहा असून त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड होती. या लोकांनी रातोरात भिंत बांधून गुहा बुजवून टाकलेली आहे. पुरातत्व खात्याला बोलवून ती पिंड आम्हाला बाहेर काढायची आहे. पुरातन काळापासून असलेली ती महादेवाची पिंड तिथे भिंतीच्या आड डांबून ठेवलेली आहे ती आम्हाला बाहेर काढायची आहे.
५. ‘महसूल खात्याकडून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी’, असा अर्ज आम्ही महसूलमंत्री विखे पाटील यांना दिला आहे. महसूलमंत्र्यांनी याविषयी आदेश काढून नगर जिल्हाधिकारी यांची एक समिती गठित करून त्याविषयीचा एक अहवाल सिद्ध केला आहे आणि तो अहवाल राज्य शासनाकडे सुपुर्द केला आहे.
संपादकीय भूमिकाधर्मांधांकडून हिंदूंच्या भूमीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी वक्फ बोर्ड कायदा रहित करणे अपेक्षित आहे ! |