आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे (शिकवणीचे साधकांना झालेले लाभही अंतर्भूत !)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड २)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, म्हणजे ज्ञानाचा मेरूपर्वत आणि गुणांचा महासागर ! त्यांचे सहज आचरणही साधनेचे विविधांगी दृष्टीकोन देणारे असून त्यातून ‘योग्य आणि परिपूर्ण कृती कशी करावी ?’, हे कळते. ते सूक्ष्मातूनही साधकांना शिकवतात. त्यामुळे ‘प्रतिकूल परिस्थितीतही ते सूक्ष्मातून आपल्या समवेत असून आपल्याला योग्य साधनेची दिशा देणारच आहेत’, ही साधकांची श्रद्धा वाढते. त्यांचे शिकवणे चैतन्याच्या स्तरावरील असल्यामुळे त्यांची शिकवण साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोचून ती सहजपणे साधकांच्या आचरणातही येते. अशा महान गुरूंची शिकवण आचरणात आणून शीघ्र गुरुकृपेस पात्र होण्यासाठी उपयुक्त असलेला हा ग्रंथ आहे. तरी साधक आणि वाचक यांनी हा ग्रंथ संग्रही ठेवावा !
संकलक : हिंदु राष्ट्र-स्थापनेचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि सहसंकलक पू. संदीप गजानन आळशी |
ग्रंथाचे मनोगत
‘परीस लोखंडाला सुवर्णत्व देऊ शकतो; पण परीसत्व नाही. याउलट गुरु शिष्यावर कृपा करून त्याला स्वतःचे गुरुत्वच देतात ! गुरुकृपा होण्यासाठी गुरूंची शिकवण मात्र सतत आचरणात आणावी लागते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले या महान गुरूंची शिकवण आचरणात आणल्यामुळे आजपर्यंत (१८.१०.२०२३ पर्यंत) अवघ्या ३३ वर्षांत सनातनचे १२७ साधक संत बनले आहेत, तर १ सहस्र ४६ साधक लवकरच संत बनण्याच्या मार्गावर आहेत ! यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या गुरुत्वाची थोरवी लक्षात येते. अशा महान गुरूंची शिकवणही किती महान असेल ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, म्हणजे ज्ञानाचा मेरूपर्वत आणि गुणांचा महासागर ! त्यामुळे त्यांच्या शिकवणीची उंची आणि खोली यांचा सहजासहजी थांग लागत नाही. ते शब्दांतून तर अध्यात्म शिकवतातच; पण त्यांचे नित्य सहज आचरणही साधनेचे विविधांगी दृष्टीकोन देणारे आणि इतके आदर्श आहे की, त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येकच जण पुष्कळ काही शिकून जातो. त्यांचे आचरण पाहून आपल्यालाही ‘योग्य आणि परिपूर्ण कृती कशी करावी ?’, हे कळते. आपण ‘शब्दांतून जे शिकतो’, त्यापेक्षा ‘कृतीतून जे शिकतो’, ते आपल्या अधिक स्मरणातही रहाते. या दृष्टीने या ग्रंथात दिलेले साधकांचे अनुभव मौलिक आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातूनही साधकांना विविध प्रकारे कसे शिकवतात? हेही या ग्रंथात दिले आहे. हे वाचून ‘कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असली अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर स्थुलातून आपल्या जवळ नसले, तरी ते सूक्ष्मातून आपल्या समवेत असून आपल्याला योग्य साधनेची दिशा देणारच आहेत’, ही साधकांची श्रद्धा वाढायलाही साहाय्य होईल.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साक्षात् चैतन्यमूर्ती असल्याने त्यांचे शिकवणेही चैतन्याच्या स्तरावरील आहे. त्यामुळेच त्यांची शिकवण साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोचून ती सहजपणे साधकांच्या आचरणात येते, तसेच अनेक वर्षांनीही प्रसंगानुरूप ती शिकवण साधकांना आठवते ! त्यांच्या शिकवणीचे हे एक आगळे वैशिष्ट्यच आहे. त्यांच्या शिकवणीचे साधकांना झालेले विविध लाभही ग्रंथात दिले आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून अनेक जण अनेक प्रकारे शिकले आहेत आणि शिकतही आहेत. काही साधकांनी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिली. त्या सूत्रांच्या आधारे हा ग्रंथ सिद्ध केला आहे. अनेक साधक वेळोवेळी त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देतच असतात. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शिकवणीच्या ग्रंथांच्या पुढे आवृत्त्यांवर आवृत्त्या निघणार आहेत.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची शिकवण सर्वांनी आचरणात आणून चांगली साधना करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घेतली, तर या ग्रंथाचे खर्या अर्थाने सार्थक होईल. असे लवकर होवो’, ही श्री गुरुचरणी मनोभावे प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी (६.९.२०२३)
ऑनलाईन खरेदीसाठी ‘सनातन शॉप’ ला भेट द्या !हा ग्रंथ ‘सनातन शॉप’ च्या shorturl.at/ezDHU या मार्गिकेवर उपलब्ध आहे. |
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी आतापर्यंत प्रकाशित झालेले विविध ग्रंथसच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा साधनाप्रवास खंड १. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे खंड २. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व खंड ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १) साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती |