महर्षींच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या ‘आयुष होमा’च्या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, सर्वत्रच्या साधकांचे सर्व त्रास दूर व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ दिवसांचा (५ आणि ८.१२.२०२२ या दिवशी) आयुष होम करण्यात आला. या होमाला यज्ञस्थळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. होमाच्या मांडणीतील घटक, पुरोहित आणि उपस्थित सद्गुरुद्वयी या सर्वांवर आयुष होमाचा होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यात आला. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

 

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे घटकांतील सकारात्मक ऊर्जा मोजतांना काही घटकांची प्रभावळ २३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती अचूक मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे अशा घटकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अचूक मोजण्यासाठी ‘लोलका’चा उपयोग करण्यात आला आहे. हे लक्षात घेऊन लेखात दिलेल्या सारण्या वाचाव्यात.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. आयुष होमानंतर मांडणीतील घटकांमधील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ होणे : आयुष होमासाठी केलेल्या मांडणीतील भगवान शिवाचे चित्र, पार्वती कलश, शिव कलश आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्या होमापूर्वी आणि ८.१२.२०२२ या दिवशी होमानंतर चाचण्या करण्यात आल्या. होमानंतर या सर्वांमधील सकारात्मक ऊर्जेत अनेक पटींनी वाढ झाल्याचे दिसून आले.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१ आ. आयुष होमामध्ये आहुती देण्यासाठी वापरण्यात आलेल्या चूर्णांमध्ये होमानंतर नकारात्मक ऊर्जा आढळणे आणि सकारात्मक ऊर्जा घटणे : आयुष होमामध्ये आहुती देण्यासाठी वापरण्यात आलेल्या करूंगाळी आणि मूलिका चूर्णांमध्ये होमापूर्वी (५.१२.२०२२ या दिवशी) मूलतः नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा होती. होमानंतर (८.१२.२०२२ दिवशी) मात्र त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली आणि सकारात्मक ऊर्जा घटली.

१ इ. यज्ञकुंडातून निघणार्‍या धुरातील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर वाढणे : आयुष होमामध्ये विविध घटकांची आहुती दिल्यानंतर यज्ञकुंडातून निघणार्‍या धुरामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा आढळून आली. प्रत्येक आहुतीनंतर धुरातील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर वाढत गेली.

१ इ १. गुग्गुळ धुपाचा धूर, करूंगाळी-मूलिका चुर्णाचा धूर, मारवा अत्तराचा धूर, महामृत्यूंजय हवनाचा धूर आणि महापूर्णाहुतीचा धूर यांच्यामध्ये उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून येण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव ! : ‘यज्ञामध्ये विविध प्रकारच्या हविष्याची (हवनीय द्रव्यांची किंवा घटकांची) आहुती दिल्यानंतर त्यातून निर्माण झालेल्या यज्ञीय धुरामध्ये विविध देवतांच्या वायुमय तत्त्वलहरी कार्यरत होतात. त्यामुळे ‘विविध घटकांपासून निर्माण झालेल्या यज्ञीय धुराचा आध्यात्मिक स्तरावर विविध प्रकारे परिणाम होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर प्रमाणात वाढत गेली आणि त्यातून समष्टीला पुष्कळ लाभ झाला’, हे खालील सारणीतून आपल्या लक्षात येईल.

–  कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२३, सायं. ५.३५)

१ ई. आयुष होमाला उपस्थित पुरोहित आणि सद्गुरुद्वयी यांच्यातील सकारात्मक ऊर्जा  होमानंतर पुष्कळ वाढणे : आयुष होमाला उपस्थित पुरोहितांमधील नकारात्मक ऊर्जा होमानंतर पुष्कळ न्यून झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. होमापूर्वीही सद्गुरुद्वयींमध्ये (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये) पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती आणि होमानंतर तिच्यात पुष्कळ वाढ झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

श्री. गिरीश पाटील

२ अ. आयुष होमामध्ये आहुती देण्यासाठी वापरण्यात आलेल्या चूर्णांमध्ये होमानंतर नकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : करूंगाळी चूर्ण हे वातावरणातील नकारात्मकता शोषून घेते आणि मूलिका चूर्ण हे वातावरणाचे निर्जंतुकीकरण करते. आयुष होमाच्या वेळी करूंगाळी आणि मूलिका चूर्णांनी वातावरणातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली अन् हे वैज्ञानिक चाचणीतून दिसून आले. या दोन्ही चूर्णांची आहुती दिल्यानंतर यज्ञकुंडातून निघणार्‍या धुरातील सकारात्मक ऊर्जा वाढली. याचे कारण म्हणजे अग्निसंस्कार झाल्यामुळे या दोन्ही चूर्णांनी शोषून घेतलेली वातावरणातील नकारात्मकता नष्ट झाली आणि परिणामस्वरूप यज्ञकुंडातून निघणार्‍या धुरातील सकारात्मक ऊर्जा वाढली.

२ अ १. होमानंतर करूंगाळी आणि मूलिका या चूर्णांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून येण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव ! : करूंगाळी चूर्णामध्ये देवीतत्त्व आणि मूलिका चूर्णामध्ये दत्ततत्त्व कार्यरत असते. सनातनचे साधक समष्टी साधना करून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दैवी कार्यात सहभागी होतात, तर ते व्यष्टी साधना करून ईश्वराची कृपा संपादन करत असतात. आयुष होमाच्या वेळी सनातनच्या साधकांवर समष्टी स्तरावर सूक्ष्मातून आक्रमणे करणार्‍या मोठ्या वाईट शक्तींनी केलेली सूक्ष्मातील आक्रमणे पार्वतीदेवीच्या कृपेने करूंगाळी चूर्णामध्ये आकृष्ट झाली, तसेच सनातनच्या साधकांना व्यष्टी स्तरावर होणारा अतृप्त पितरांचा त्रास दत्तकृपेने

कु. मधुरा भिकाजी भोसले

मूलिका चूर्णामध्ये शोषला गेला. त्यामुळे साधकांना होणारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रास ३५ टक्के न्यून झाले. वरील प्रक्रिया सूक्ष्म स्तरावर घडल्यामुळे होमानंतर करूंगाळी आणि मूलिका या चूर्णांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली.’

– सुश्री(कु.) मधुरा भोसले  (२६.१०.२०२३, सायं. ५.४०)

२ आ. आयुष होमाला उपस्थित पुरोहित आणि सद्गुरुद्वयी यांनी होमातील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढणे : आयुष होम हा चैतन्यदायी ऊर्जा प्रदान करणारा आहे. आयुष होमाच्या वेळी यज्ञकुंडातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा मनुष्याच्या चेतना शक्तीला शुद्ध आणि सशक्त करते. आयुष होमाला उपस्थित पुरोहित आणि सद्गुरुद्वयी यांनी होमातील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.

३. सनातन संस्थेच्या धर्म आणि राष्ट्र रक्षण यांच्या कार्यासाठी सेवा करणार्‍या साधकांना देवाने आशीर्वाद देणे

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयुष होम पार पडला. ‘सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी, तसेच धर्म आणि राष्ट्र रक्षण यांचे कार्य करणार्‍या साधकांचे स्वास्थ्य निरोगी रहावे, सर्वत्रच्या साधकांचे सर्व त्रास दूर व्हावेत अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, यासाठी देवाने आशीर्वाद दिला’, असे जाणवले.’

– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.१०.२०२३)

इ-मेल : mav.research2014@gmail.com