रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
१. श्री. महेश धाडी
अ. ‘रामनाथी आश्रम पुष्कळ छान आहे. येथील कार्य पाहिल्यानंतर ‘मी एक हिंदू आहे’, याचा मला अभिमान वाटत आहे.’
२. अधिवक्ता सुधाकर राय, मंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. आश्रम पाहून मला चांगले वाटले. मला मनाची शांती अनुभवता आली.’
३. अधिवक्ता सतीश के., मंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रम पाहिल्यावर मला ‘हिंदु धर्म’ आणि ‘अध्यात्मातील तत्त्वे’, यांविषयी समजले, तसेच त्याविषयी अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली.
आ. एकाच दिवशी मला आपल्या धर्माविषयी पुष्कळ काही शिकायला मिळाले. हा अनुभव अतिशय चांगला होता.’
४. अधिवक्त्या (कु.) स्वराग्नी मूर्ती, बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रमात एवढे सकारात्मक वातावरण पहायला मिळाल्याबद्दल मला पुष्कळ चांगले वाटले.
आ. ‘एखादा आश्रम किंवा संस्था कशी चालवावी ?’, याविषयी एक मार्गदर्शक पुस्तक या आश्रमाने उपलब्ध करून द्यावे. ते पुस्तक पुढे ‘संस्थात्मक वर्तना’चे पाठ्यपुस्तक बनू शकेल.’
आश्रमातील ‘संशोधन’ आणि ‘संगीत’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
१. अधिवक्ता सतीश के., मंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘भक्तीसंगीताचे महत्त्व आणि त्यातील सकारात्मकतेचे प्रमाण’, यांविषयी मला शिकायला मिळाले.’
२. अधिवक्त्या (कु.) स्वराग्नी मूर्ती, बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘हे सादरीकरण अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘संगीत आणि कला यांच्या माध्यमातून उच्च स्तरावरील चैतन्यापर्यंत पोचू शकतो’, ही संकल्पना चांगल्या प्रकारे प्रस्तुत केली आहे. जगभरातील कलाकारांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.६.२०२३)