पतंग उडवतांना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने १० वर्षीय मुलाचा पाय कापावा लागला !
नागपूर – येथील समतानगर भागात पतंग उडवतांना विजेच्या तारांचा स्पर्श होऊन १० वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजला. त्याचा एक पाय कापावा लागला. तो पतंग उडवतांना इमारतीजवळून जाणार्या विजेच्या तारांचा त्याला स्पर्श झाल्याने तो भाजला. त्याच्या मानेपासून शरिराचा खालचा भाग पूर्णपणे भाजला होता. जखमा इतक्या खोल झाल्या होत्या की, त्याचे हात-पाय यांची हाडे दिसत होती. त्यामुळे त्याचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाले. ६० टक्के भाजल्याने त्याला सध्या अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्याच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार पूर्णपणे नि:शुल्क करण्यात येत आहेत.