महागडा भ्रमणभाष अल्प किमतीत देण्याचे आमीष दाखवून फसवणारा आरोपी अटकेत !
मुंबई – महागडा भ्रमणभाष अल्प किमतीत देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणार्या एका आरोपीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. गणेश भालेराव (वय २९ वर्षे) असे त्याचे नाव आहे. तो पुणे येथून विमानाने गोवा येथे निघाला होता. उड्डाण करणार असलेले विमान थांबवून पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले. स्वतःकडील महागडा भ्रमणभाष अल्प किमतीत विकणार असल्याचे त्याने एका तरुणाला सांगितले. त्याने सांगितल्यानुसार तरुणाने खात्यात ८४ सहस्र रुपये जमा केले; पण त्यानंतर आरोपीने भ्रमणभाष बंद केला. यामुळे तरुणाने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीची ओळख पटवली आणि कारवाई केली.
संपादकीय भूमिकाफसव्या लोकांच्या आमिषाला बळी न पडता जनतेने सतर्क आणि सावध रहावे आणि इतरांनाही करावे ! |