श्रीरामचरितमानसच्या दुप्पट प्रती छापूनही साठा शेष नाही ! – गीता प्रेसची माहिती
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशात श्रीरामचरितमानसच्या प्रतींची मागणी वाढली आहे. यामुळे येथील प्रसिद्ध गीता प्रेसमध्ये ५० वर्षांत प्रथमच श्रीरामचरितमानसच्या प्रतींची छपाई रात्रंदिवस केली जात आहे. याविषयी गीता प्रेसचे व्यवस्थापक श्री लालमणी त्रिपाठी म्हणाले की, श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिनांक घोषित झाल्यानंतर सुंदर कांड आणि हनुमान चालिसा यांसमवेत श्रीरामचरितमानस ग्रंथाची मागणी वाढली. मागील काही वर्षांत आम्ही प्रत्येक महिन्याला श्रीरामचरितमानसच्या ७५ सहस्र प्रती प्रकाशित करत होतो. या वर्षी १ लाख प्रती छापल्या असून सध्या साठा शेष नाही.