Congress Unforgivable Crime : श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित न रहाण्याचा काँग्रेसने घेतलेला निर्णय, हा अक्षम्य अपराध ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना
बेळगाव – श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला न जाण्याचा काँग्रेसने घेतलेला निर्णय, हा अक्षम्य अपराध आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केली. ते हुक्केरी येथे वार्ताहरांशी बोलत होते.
श्री. मुतालिक पुढे म्हणाले की, सर्वांनी भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या नव्हे, तर श्रीरामाच्या दर्शनासाठी जायला हवे. ५०० वर्षांनंतर होणार्या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणे, हे काँग्रेसचे दुर्भाग्यच आहे. हिंदूंच्या श्रीरामाचा शाप तुम्हाला खरोखरच लागेल. या सोहळ्यात सहभागी होऊन तुम्ही हिंदु समाजाशी एकरूप झाला असता, तर तुम्हालाही श्रीरामकृपेचा लाभ झाला असता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच काँग्रेस हिंदूंच्या बाजूने उभी राहिलेली नाही, तर ती मुसलमानांचे लांगूलचालन करण्यातच मग्न आहे.