मुंबई येथे ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जीवनचरित्र स्पर्धे’चे व्यापक आयोजन ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री
मुंबई – अयोध्या येथे होणार्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘मर्यादापुरुषोत्तम श्रीराम जीवनचरित्र स्पर्धा’ होणार आहे. ही स्पर्धा १० ते १७ जानेवारी या कालावधीत येथील १ सहस्र १४६ शाळांमध्ये घेण्यात येत आहे. यामध्ये श्रीराम यांच्या जीवनावर आधारित चित्रकला, निबंध, काव्यलेखन आणि नाट्यस्पर्धा होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.