KalaRam Darsan PM MODI : नाशिक येथील काळाराम मंदिरातील प्रभु श्रीरामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन !
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी या दिवशी येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन प्रभु श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात विधीवत् पूजा आणि आरती करण्यात आली. या वेळी श्री काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत आणि विश्वस्त यांच्या वतीने मोदी यांचा प्रभु श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘सियावर रामचंद्र की जय’ घोषणांनी काळाराम मंदिर परिसर दुमदुमला.
BJP4India #BJP4Maharashtra #Dev_Fadnavis #cbawankule #श्रीमहंत2024 pic.twitter.com/x8Mc2qzG5L
— Shri Mahant sudhirdas Maharaj (@mahantpt03) January 13, 2024
१. या वेळी काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त सर्वश्री धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी, तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
आज मला नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिरात प्रार्थना करण्याची आणि रामकुंड इथे झालेल्या पूजेत सहभागी होण्याची संधी मिळाली. संत एकनाथ जी यांनी मराठी भाषेत लिहिलेल्या भावार्थ रामायणातील श्लोकही मी आज ऐकले. pic.twitter.com/fraX3xV7eX
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील ८ व्या अध्यायाचे (ज्यामध्ये प्रभु श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे), वाचन करण्यात आले. या वेळी मंदिर परिसरात उपस्थित असणारे महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी मोदी यांनी संवाद साधला. मोदी यांनी मंदिर परिसरातील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.