जळगाव येथे भीक मागणार्या १३ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधास अटक !
जळगाव – भीक मागून उदरनिर्वाह करणार्या १३ वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करणारा वसीम खान अय्युब खान (वय २५ वर्षे) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)
सुभाष चौक परिसरातील मंदिराजवळ १३ वर्षीय मतीमंद मुलगी तिच्या नातेवाइकांसमवेत ५ जानेवारी या दिवशी भीक मागत असतांना वसीम खान याने तिला बोलावून दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला जळगाव-भुसावळ मार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
संपादकीय भूमिका
|