अयोध्या धर्मनगरीत आहेत ८ मशिदी आणि ४ कब्रस्तान !

अयोध्या – शहरात २२ जानेवारी या दिवशी श्री रामलला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. जगभरातील हिंदु समाज या सोहळ्याची सिद्धता करण्यात व्यस्त आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या काही नेत्यांसह अनेक साम्यवादी या कार्यक्रमाला विरोध करत आहेत. या कार्यक्रमाला धार्मिक रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिंदूंना ‘कट्टरतावादी’ रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र ‘हेच हिंदुद्वेेष्टे श्रीराममंदिराच्या आजूबाजूला ८ मशिदी आणि ४ कब्रस्तान आहेत, हे वास्तव लपवून ठेवत आहेत’, असे हिंदूंचे म्हणणे आहे. अयोध्येत मुसलमानबहुल भाग असून येथील मुसलमान त्यांच्या धार्मिक श्रद्धांचे उघडपणे पालन करतात.

अयोध्येत आहेत ४ गुरुद्वारा आणि २ जैन मंदिरे !

अयोध्या धर्मनगरीत ४ गुरुद्वारा आणि २ जैन मंदिरे आहेत. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले हे गुरुद्वारा हिंदु आणि शीख धर्मांमधील ऐक्याचे प्रतीक आहेत. शीख आणि जैन धर्मियांची धार्मिक स्थळेही श्रीरामाशी जुने संबंध असल्याचे दर्शवतात.

अयोध्येत आहेत जवळजवळ ३ सहस्र ४०० मंदिरे

अयोध्येत जवळजवळ ३ सहस्र ४०० मंदिरे आहेत. या मंदिरात सनातन धर्मानुसार विविध उपासना पद्धती चालू आहेत. यातून हा संदेश दिला जातो की, विविधता असूनही हिंदु धर्माचा गाभा एकच आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक समुदायाला श्रीराम पूज्य आणि स्वीकारार्ह आहेत.