Netflix removes Annapoorani film : हिंदूंच्या विरोधानंतर ‘नेटफ्लिक्स’वरून ‘अन्नपूर्णानी’ चित्रपट हटवला !
|
(‘नेटफ्लिक्स’ हा एक ‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ मंच आहे. ओटीटीद्वारे दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात.)
मुंबई – हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर ‘अन्नपूर्णानी’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी मंचावरून हटवण्यात आला, तसेच चित्रपटाचे निर्माते ‘झी स्टुडिओज’नेही या प्रकरणी क्षमा मागत ‘या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्यात येईल’, असे सांगितले आहे. ‘अन्नपूर्णानी’ या चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे हिंदूंकडून विरोध करण्यात आला होता. या संदर्भात मुंबईत गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
सौजन्य इंडिया टूडे
या चित्रपटात ब्राह्मण हिंदु तरुणीचा प्रियकर मुसलमान असल्याचे दाखवण्यात आला आहे. हा मुसलमान प्रियकर या तरुणीला ‘श्रीराम वनवासात असतांना मांसाहार करत होता’, असे सांगतो आणि तिला ‘नमाजपठण करत बिर्याणी बनवल्यास तिला चांगली चव येते’ असा सल्ला देतो. त्यामुळे ही तरुणी नमाजपठण करत बिर्याणी बनवते, असेही यात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता आणि २९ डिसेंबर २०२३ या दिवशी नेटफिक्लक्सवर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर या चित्रपटाला विरोध होऊ लागला.
After opposition from Hindus, Netflix removes 'Annapoorani film'
Producer of @ZeeStudios_ issues apology
Offensive scenes will be removed.Mere apologies are inadequate. The Central Board of Film Certification and the producers who allowed the film to air should be punished!… pic.twitter.com/gBmaK8y8oP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2024
संपादकीय भूमिकाकेवळ क्षमा मागून चालणार नाही, तर या चित्रपटाला अनुमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि निर्माते यांना शिक्षा झाली पाहिजे ! तरच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांवर वचक बसेल ! |