हावेरी (कर्नाटक) येथे मुसलमानांकडून एकत्र असणार्या हिंदु पुरुष आणि मुसलमान महिला यांना हॉटेलमध्ये घुसून मारहाण !
हावेरी (कर्नाटक) – येथील हनागल भागात काही मुसलमान तरुणांनी एका हॉटेलच्या खोलीमध्ये घुसून एक मुसलमान महिला आणि हिंदु पुरुष यांना मारहाण केली. आफताब मकबूल अहमद चन्दनकट्टी, मदरसब महंमद इसाक मन्दक्की आणि समीउल्लाह ललनावर अशी मारहाण करणार्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी मुसलमान महिला आणि हिंदु मुलगा यांना खेचत हॉटेलच्या बाहेर आणले. याचा एक व्हिडिओ बनवून तो त्यांनी प्रसारित केला आहे. ही घटना ७ जानेवारीची आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून २ जणांना अटक केली आहे.
सौजन्य इंडिया टूडे
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यामुळे धर्मांधांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळेच ते गुंडगिरी करू लागले आहेत. काँग्रेसला मते देऊन सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी याचा विचार केला पाहिजे ! |