ED Raids TMC Leaders : बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’च्या धाडी !
कोलकाता – महानगरपालिका नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्री सुजित बोस यांच्या कोलकाता येथील निवासस्थानांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) अधिकार्यांनी धाडी घातल्या. याखेरीज तृणमुल काँग्रेसचे नेते तपस रॉय आणि सुबोध चक्रवर्ती यांच्या घरांवरही ‘ईडी’कडून धाडी घालण्यात आल्या.
याविषयीच्या एका वृत्तात म्हटले आहे की, १२ जानेवारीला सकाळी ‘ईडी’च्या अधिकार्यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील लेक टाऊन भागात सुजित बोस यांच्या दोन ठिकाणांवर धाडी घातल्या. यासह तपस रॉय यांच्या बीबी गांगुली मार्ग येथील निवासस्थानावर धाड घातली, तर सुबोध चक्रवर्ती यांच्या बिराटी येथील निवासस्थानी धाड घालण्यात आली.
ED raids TMC leaders' residences in #Bengal!
Action out of political grudge! – #TMC
The houses of thieves will be surely raided ! – #BJP
बंगाल I तृणमुल काँग्रेस I भाजप
Cash-for-municipalities job case#TrinamoolCongress #EnforcementDirectorate pic.twitter.com/946haPTF6v— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 12, 2024
राजकीय सूडभावनेतून कारवाई ! – तृणमूल काँग्रेस
‘ईडी’च्या या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालचे मंत्री शशी पंजा म्हणाले की, ही कारवाई राजकीय सूडभावनेतून करण्यात आली आहे.
चोरांच्या घरांवर निश्चितच धाडी घातल्या जातील ! – भाजप
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, चोरांच्या घरांवर निश्चितच धाडी घातल्या जातील. त्यांना कारागृहात पाठवावे, अशी बंगालमधील तरुणांची आणि जनतेची इच्छा आहे.