श्रीराम हे आमचे आराध्यदैवत असून आम्ही त्यांचे वंशज आहोत ! – काँग्रेसचे नेते इम्रान मसूद
मेरठ (उत्तरप्रदेश) – श्रीराम हे आमचे आराध्यदैवत असून आम्ही त्यांचे वंशज आहोत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इम्रान मसूद यांनी मेरठमधील काँग्रेसच्या संवाद आणि कार्यशाळा या कार्यक्रमात केले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे आणि नेते अधीर रंजन चौधरी यांनी श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण नुकतेच नाकारले आहे. या पार्श्वभूमीवर बोलतांना मसूद यांनी ‘श्रीरामाच्या घरी निमंत्रण दिले जात नाही. आम्ही श्रीरामाला मानणारे लोक आहोत’, असे वक्तव्य केले.
सौजन्य एबीपी गंगा