ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना पाय आणि अंग पुष्कळ दुखू लागणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्रास न्यून होऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता येणे

कु. अवधूत जगताप

‘मी ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाला बार्शी येथे गेलो होतो. तेथे ३ दिवस कार्यक्रम होता. (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.) पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी कार्यक्रमाला बसल्यानंतर मला पुष्कळ त्रास होत होता. माझे पाय आणि अंग पुष्कळ दुखायला लागले. ‘मला अनिष्ट शक्ती त्रास देत आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘मला या कार्यक्रमाला बसता येऊ दे. तुम्हीच माझा हा त्रास दूर करा.’

त्यानंतर मी अत्तर आणि कापूर लावला. नंतर मला होणारा त्रास न्यून होऊन मला पूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता आला.’

– कु. अवधूत जगताप (उच्च स्वर्गलोक – वर्ष २०२० मध्ये आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १० वर्षे), मिरज, जिल्हा सांगली. (२८.६.२०२३)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.