उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण चालू असतांना लोकांनी साहित्य पळवले !
छत्रपती संभाजीनगर – विविध शासकीय योजनांची माहिती लोकांना पोचवून त्यांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने आरोग्य किट, स्पोर्ट्स किट आणि कामगार किट वाटप करण्यासाठी गंगापूर उपसा जलसिंचन योजनेचा कार्यक्रम शहरात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत करत होते, तर दुसरीकडे व्यासपिठाच्या समोरच्या बाजूला लोकांनी गर्दी करत वाटप करण्यासाठी आणलेल्या लोखंडी पेट्या, आरोग्य किट आणि अन्य साहित्य पळवले. लाभार्थ्यांऐवजी गर्दी केलेल्या लोकांनीच या पेट्या पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.