बेल्हे (पुणे) येथे ४ गायी, ११६ वासरांची कत्तलीपासून सुटका !
पुणे – येथील बेल्हे (ता. जुन्नर) परिसरात ३ वेगवेगळ्या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ४ गायी आणि ११६ वासरांची पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा अन् आळेफाटा पोलिसांनी १० जानेवारी या दिवशी संयुक्तपणे कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी अल्ताफ बेपारी, असिफ बेपारी आणि अल्पेश कुरेशी या तिघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे. बेल्हे येथे ३ वेगवेगळ्या ठिकाणी गायी आणि वासरे दोरखंडाने बांधून ठेवलेली होती. त्यांनी ओरडू नये; म्हणून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली होती, तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती.
- गोवंशियांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून डांबले
- ३ धर्मांधांना अटक !
या सर्व जनावरांची सुटका करत त्यांना आळेफाटा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर संगमनेर येथील ‘श्री जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट गोशाळे’त त्यांची रवानगी करण्यात आली.
संपादकीय भूमिका :राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. आक्रमक प्रवृत्तीच्या कसायांना यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! |