हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १०२ कोटी रुपये संमत !
मुंबई – हुतात्मा शिवराम हरि राजगुरु यांच्या जन्मस्थळाच्या विकास आराखड्याला राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी १०२ कोटी ४८ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत.यामध्ये स्मारकाचा जीर्णाेद्धार, जन्मखोली, थोरला वाडा, तालीम आखाडा, मुख्य दरवाजा यांची दुरुस्ती आणि श्रीराम मंदिराचा जीणोद्धार यांसाठी ९ कोटी रुपये, स्मारकातील वाचनालय, उपहारगृह आणि अन्य सुविधा यांसाठी १८ कोटी रुपये, राम घाट, चांदोली घाट यांच्या विकासासाठी २१ कोटी रुपये, संरक्षित भिंत अन् वाहनतळ यांच्या विकासासाठी १ कोटी ९० लाख रुपये, पदपथ, अंतर्गत रस्ते यांसाठी १ कोटी २० लाख रुपये, सभागृह अन् पुतळे यांच्या विकासासाठी ८० लाख रुपये, तसेच स्मारकाची प्रकाशव्यवस्था, ‘प्रोजेक्शन आणि ध्वनी शो’ यांसाठी ४ कोटी ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. यांसह आकस्मिक व्यय, विमा, सल्लागार समिती यांवर व्यय केला जाणार आहे.