ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांचा १४ जानेवारीला नागरी सत्कार !
सांगली – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांचा १४ जानेवारीला सांगलीकरांच्या वतीने नागरी सत्कार होत आहे. हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता कृष्णा नदीकाठी माई घाटावरील स्वामी समर्थ मंदिराजवळ होईल. मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता उदय वारुंजीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असून त्यांचे ‘समान नागरी कायदा’ यावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक हणमंतराव पवार, सतीश साखळकर, विजय हेर्लेकर यांनी दिली.
हणमंतराव पवार पुढे म्हणाले, ‘‘बर्बे यांच्यासारख्या व्यक्तीच्या योगदानाची नोंद समाजाने घेतली पाहिजे. हा कार्यक्रम आम्ही त्यांचे वय ७५ वर्षे पूर्ण होत असल्याविषयी कृतज्ञता म्हणून घेत आहोत. कुणाकडे कोणत्याही प्रकारच्या निधीची अपेक्षा न ठेवता बर्वे यांनी सामाजिक लढे उभे केले.’’