रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील शिबिरात सहभागी झाल्यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे
१. गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना होण्यासाठी करायचे प्रयत्न
अ. माझ्याकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी प्रत्येक कृती आणि विचार व्हायला हवा.
आ. आपण प्रत्येक सेवा निरपेक्षपणे करायची, तसेच आपली प्रत्येक कृती आणि विचार निरपेक्ष असायला हवा.
इ. आपण करत असलेला प्रत्येक विचार सेवा आणि साधना याला धरूनच असावा.
ई. आपल्या मनाचा संघर्ष होत असतांना मनाप्रमाणे न करता प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करायचे. ‘त्यांना मी काय केलेले आवडेल ?’ असा विचार करायचा.
उ. ‘सहसाधकाला आनंद कसा मिळेल’, असा माझा विचार असायला हवा.
ऊ. मला साधक बनायचे आहे आणि इतरांनाही साधक बनवायचे आहे.
ए. आपण जेवढी साधना वाढवू, तेवढे गुरूंच्या जवळ जाऊ.
२. चुकांप्रती संवेदनशीलता
अ. आपल्याकडून समष्टीतील एखादी चूक झाली, तर ती सर्वांसमोर सांगायला हवी. ‘त्या चुकीतून आपण कोणता दृष्टीकोन ठेवू शकतो आणि काय सुधारणा करू शकतो ?’, हे समजून घ्यायला हवे.
आ. आपली चूक इतरांना सांगितल्याने इतरांकडून ती चूक होणार नाही. त्यातून इतरांनाही शिकता येईल आणि त्यांचा वेळ वाचेल. त्यामुळे आपली आणि इतरांचीही साधना होईल.
इ. आपल्या एका चुकीमुळे आपल्या जीवनातील काही क्षण वाया जातात. आपण अशा अनेक चुका करत राहिलो, तर आपल्या जीवनातील किती क्षण वाया जातील !
३. भावाचे महत्त्व
अ. आपण भावपूर्ण प्रार्थना केली, तर आपली कृती परिपूर्ण होईल.
आ. आपल्यातील भाव सगळ्यांना अनुभवता येईल, असा प्रयत्न करायचा.
इ. ‘गुरुदेवच मला प्रत्येक कृती शिकवत आहेत’, असा भाव ठेवायचा.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मार्गदर्शन करत असतांना मला त्यांच्यातील चैतन्याची जाणीव झाली.
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
हे श्रीमन्नारायणा, आपल्या अनंत कोटी कृपेमुळे मला या भूवैकुंठरूपी आश्रमात येता आले. मला आश्रमातील चैतन्य ग्रहण करता आले. तुम्हाला अनुभवता आले, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
– कु. जिगिषा दर्शन म्हापसेकर (वय १८ वर्षे), कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. (६.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |